मुंबईचे दिल्‍लीसमोर 219 धावांचे आव्‍हान

Posted on Wednesday, March 17, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

नाणेफेक जिंकुन मुंबई इंडियन संघास फलंदाजीस आमंत्रित करणा-या दिल्‍ली डेअरडेव्‍हील्‍स समोर मुंबईने 219 धावांचे आव्हान ठेवले आहे. तर प्रत्युत्तरादाखल दिल्‍ली संघाने दमदार सुरूवात करत सामन्‍यातील रंगत वाढणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. 

मुंबई संघाने निर्धारित 20 षटकात 218 धावा केल्‍या आहेत. कर्णधार सचिन तेंडुलकरने 63, सौरव तिवारी 61 तर अंबाती रायडू याने 34 धावांची शानदार खेळी केली.

सचिनला अमित मिश्राने बाद केले. तर सनथ जयसूर्या (7), कीरोन पोलार्ड (10), ड्वेन ब्रेवो (9) तर आदित्य तारे याने 17 धावा केल्‍या.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मुंबईचे दिल्‍लीसमोर 219 धावांचे आव्‍हान"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner