हो! व्हीडिओतील व्यक्ती मीचः स्वामी नित्यानंद
Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk
आपण अध्यात्माच्या संस्कारांवर विश्वास ठेवत असून लोकांची कुठल्याही स्वरूपाची दुःखे दूर करण्यासाठी काम करीत असल्याचा बनाव करीत अभिनेत्री रंजीता सोबतच्या सेक्स व्हीडियोत आपणच असल्याची कबुली स्वामी परमहंस नित्यानंद यांनी दिली आहे. मात्र असे करताना या व्हीडिओशी छेडछाड झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रंजीताने व्हीडिओत आपण असल्याचे काही दिवसांपूर्वीच मान्य केले आहे.
नित्यानंद स्वामी तमीळी अभिनेत्री रंजीतासोबत अनावृत्त अवस्थेत कामक्रीडेत रत असल्याचा व्हीडिओ गेल्या 2 मार्च रोजी एका दाक्षिणात्य वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता. यानंतर नित्यानंद यांच्याबद्दल देशभर रोष व्यक्त केला गेला. तर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर बाबा अनेक दिवसांपासून भूमिगत होते. आता एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन त्यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यात व्हीडिओ आपण असल्याचे मान्य केले असले तरीही त्यासोबत छेडछाड करण्यात आल्याचा सोयीस्कर आरोप केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "हो! व्हीडिओतील व्यक्ती मीचः स्वामी नित्यानंद"
Post a Comment