लव्ह सेक्स और धोखा- वास्तवाचे दर्शन!
Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk
हा चित्रपट म्हणजे त्यातल्या तीन शब्दांवर आधारीत तीन कथा आहेत. त्यांची सुयोग्य बांधणी दिवाकरने केली आहे.
प्रेम हे चित्रपटातल्या प्रेमासारखे हळूवार नसते हे पहिल्या कथेत सांगितले आहे. दुसर्या कथेत एका तरूणीचा उपभोग घेऊन तिच्याशी केलेल्या सेक्सची फिल्म बनवून ती विकणारा तरूण आहे आणि तिसर्या कथेत एका पॉप सिंगरने एका तरूणीचे केलेले शोषण आणि मीडीयाची सवंग भूमिका दर्शवली आहे.
या चित्रपटाची गाणी ऐका
या तिनही कथा पाहताना आपण चित्रपट पहातो आहे, असे वाटत नाही. या घटना आपल्या आजूबाजूलाही घडत
असतात, त्याच समोरही घडत आहेत असा फिल येतो. त्यातच या कथांचे चित्रण छुप्या कॅमेर्याने करण्याचे तंत्र अतिशय वाजवी ठरले आहे. केवळ तंत्र म्हणून हा बदल न रहाता लोकांची दुसर्याच्या घरात डोकावून बघण्याची मानसिकताही त्यातून प्रतिकात्मकरित्या प्रतिबिंबित होते.
या चित्रपटात कोणीही मोठा कलांवत नाही. तरीही तो आपल्याला खिळवून ठेवतो, यातच त्या अनोळखी कलावंतांच्या अभिनयाला दिलेली दाद सामावलेली आहे. वास्तववादी आरसा या चित्रपटाच्या निमित्ताने दिवाकरने आपल्यासमोर ठेवला आहे. कोणत्याही पूर्वग्रहित दृष्टिकोनाशिवाय या आरशात पहायला हरकत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "लव्ह सेक्स और धोखा- वास्तवाचे दर्शन!"
Post a Comment