मायावतींच्या रॅलीत दोनशे कोटींचा खर्च
Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk
काही दिवसांपूर्वी प्रतापगड येथे कृपालू महाराजांच्या आश्रमात चेंगराचेंगरीत ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत आणि सरकारची आर्थिक स्थिती खराब असल्याचा बनाव करणा-या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मात्र दोनशे कोटी रुपयांची मोठी रक्कम खर्च केली असून यातील बरीचशी रक्कम सरकारी खर्चातून करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली असून राज्यातील बरेली शहरात गेल्या 12 दिवसांपासून धार्मिक दंगली उसळल्या असताना मुख्यमंत्री मायावती यांनी मात्र पक्षाचे नेते कांशीराम यांच्या जन्म दिवस आणि बसपाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. यानिमित्त लखनऊ शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी 25 लाख लोकांना बोलावण्यात आले आहे. सरकारने या संपूर्ण आयोजनासाठी 200 कोटी रुपए खर्च केले आहेत.
मुख्यमंत्री मायावती हेलीकॉप्टरने कार्यक्रम स्थळी आल्या त्यानंतर येथे उपस्थित नेत्यांनी त्याना भलामोठा हार घालून त्यांचे स्वागत केले.
पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शहरात मोठ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण शहरात रोषणाई करण्यात आली आहे. तर मायावतींनी उभारलेल्या स्मारक आणि पार्कमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
गरीब आणि शोषितांच्या भल्यासाठी काम करण्याचे वचन देत सत्तेवर आलेल्या मायावती यांनी केलेल्या या अफाट सरकारी खर्चामुळे गरीबांचे कुठले भले होईल हे मात्र समजू शकलेले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "मायावतींच्या रॅलीत दोनशे कोटींचा खर्च"
Post a Comment