पाक भारताकडे कसाब मागणार!

Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद


मुंबई हल्‍ल्‍यातील जिवंत दहशतवादी अजमल आमीर कसाबला आपल्‍याकडे सोपविण्‍यात यावे अशी मागणी पाकिस्तान भारत सरकारकडे करण्‍याची शक्यता असून त्या दृष्‍टीने काय करता येईल याबाबत सध्‍या तेथे विचार सुरू आहे.


कसाबला अटक करण्‍यासाठी पाक ही मागणी करणार आहे. पाकच्‍या म्हणण्‍यानुसार कसाबकडून मुंबई न्‍यायालयात देण्‍यात आलेल्‍या जबानीवर त्‍यांचा विश्‍वास नाही. यापूर्वी पाकने हाफिद सईद विरोधात कारवाईसही नकार दिला होता.
तर भारताकडून सोपविण्‍यात आलेल्‍या अनेक पुराव्‍यांवरही पाकने काहीही कार्यवाही केलेली नाही. पाक सरकारने आता रावळपिंडी न्‍यायालयाकडे कसाबला पाकमध्‍ये आणण्‍यासाठी
परवानगी मागितली आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पाक भारताकडे कसाब मागणार!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner