आमदाराला सभागृहाबाहेर फेकल्‍याने वाद

Posted on Wednesday, March 17, 2010 by maaybhumi desk

श्रीनगर

इंटर डिस्क्रीट रिक्रुटमेंट बिलवर चर्चेची मागणी करणा-या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्‍या (पीडीपी) आमदारास जम्मू व काश्मीर विधानसभा सभापती अकबर लोन यांनी मार्शल करवी सभागृहाबाहेर फेकल्‍यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी या घटनेनंतर सभागृह डोक्यावर घेतले आहे.
सभागृहाच्‍या कामकाजा दरम्‍यान पीडीपी आमदार अब्दुला खान यांनी सभापतींकडे इंटर डिस्क्रिट रिक्रुटमेंट विधेयकावर चर्चेची मागणी केली. यावेळी दुसरे आमदार इंजीनियर रशीद यांनीही सभापतींकडे अशी मागणी करीत दबाव निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला.

सभापती लोन यांनी सुरूवातीला समजावण्‍याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर लगेच मार्शल्‍सला सांगून आमदाराला सभागृहाबाहेर फेकले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "आमदाराला सभागृहाबाहेर फेकल्‍याने वाद"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner