'माया' हारः या मुद्यांची चौकशी होणार
Posted on Wednesday, March 17, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
मायावतींना हजार-हजारच्या नोटांचा पाच कोटी रुपयांचा हार घातल्या प्रकरणाची आयकर विभागाने चौकशी सुरू केली असून या चौकशीत खालील बाबी तपासल्या जाणार आहेत.
एवढी रोख आली कुठून
आयकर विभाग या हार प्रकरणाची चौकशी करताना सर्वप्रथम यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आली कुठून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हा पैसा आला कुठून हे पाहून या हारातील नोटा मोजून ते किती रुपये आहेत. हे पाहिले जाणार आहे.
हार जप्त होणार
मायावती यांच्या हारावर आयकर विभागाची चौकशी सुरू असून या हारासाठी अवैधरित्या वापरल्या गेलेल्या पैशांच्या चौकशीसाठी आयकर विभाग हा हार आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता आहे. जर ही भेट असेल तर ती दिली कुणी हे देखिल पाहिले जाणार आहे.
काही मंत्रीही चौकशीच्या फे-यात
महारॅलीत मायावतींना हार घालणा-या मंत्र्यांनाही विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असून तपासणीत तर हार घालणा-या मंत्र्यांचेच पैसे या हारमध्ये लागले असल्याचे आढळले तर मायावतीच्या मंत्र्यांवरही संकट येण्याची शक्यता आहे.
बसपाच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त 15 मार्च रोजी लखनऊत झालेल्या महारॅली दरम्यान मायावती यांना एक-एक हजाराच्या नोटांनी बनविलेला कोट्यवधी रुपयांचा हार घालण्यात आला होता. यानंतर 16 मार्च रोजी विरोधकांनी या हारावर तीव्र आक्षेप घेत त्याच्या चौकशीची मागणी केली होती. या हारावरून निर्माण झालेल्या वादामुळे लोकसभा 12 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "'माया' हारः या मुद्यांची चौकशी होणार"
Post a Comment