माया 'हार' पाच कोटी रुपयांचा

Posted on Wednesday, March 17, 2010 by maaybhumi desk


लखनऊ
उत्तर प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्री मायावती यांनी आपल्‍या पक्षाच्‍या स्‍थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्‍या कार्यक्रमासाठी दोनशे कोटी रुपयांची मोठी रक्कम खर्च केलेले अपूर्ण झाले की काय म्हणून बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पैशांची माळा घातली. ही माळा तब्बल पाच कोटी रुपयांची असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे.


मायावती यांना घातलेल्या माळेत 50 हजार नोटा होत्या. त्यातील प्रत्येक नोट एक हजार रुपयांची होती. यामुळे ती माळा पाच कोटी रुपयांची झाली. सुरूवातीला ही माळा विदेशी फुलांची असल्याचे सां‍गण्यात आले. परंतु फोटोंच्या माध्यमातून त्यात हजार, हजार रुपयांच्या नोटा स्पष्ट दिसू लागल्या.

बसपाच्या कर्नाटक शाखेने ही माळा तयार केली होती. परंतु त्याच्यावरुन वाद सुरु होताच देशभरातील कार्यकर्त्यांनी ती दिली असल्याचे बसपाच्या कर्नाटक शाखेने सांगितले. या कार्यक्रमासाठी सरकारचे 200 कोटी रुपये खर्च करण्‍यात आले आहेत. यापूर्वी मायावतींच्या वाढदिवसालाही त्यांना खूष करण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत होते. आता पक्षाच्या स्थापनादिवसालाही ती परंपरा सुरु झाली.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "माया 'हार' पाच कोटी रुपयांचा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner