महिला आरक्षणात कपातीचे पवारांचे संकेत
Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk
मुंबई
महिला आरक्षण विधेयकांतर्गत दिल्या जाणा-या 33 टक्के आरक्षणात कपात केली जाऊ शकते असे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. पुणे येथील कार्ल्याजवळ झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना पवार म्हणाले, की विधेयकात दुरुस्ती केली जाऊ शकते आणि विधेयकास सर्व पक्षीय संमतीसाठी ते 33 टक्क्यावरून 20 वर आणले जाऊ शकते.
पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाच्या समारोप प्रसंगी पवार म्हणाले, की महिला आरक्षणा संदर्भात राजद नेते लालू प्रसाद यादव, सपा सुप्रीमो मुलायम सिंह आणि जद-यू नेता शरद यादव यांच्याशी चर्चा सुरू आहे.
मुस्लिम महिलांसंदर्भात या नेत्यांनी वर्तविलेल्या काळजीतून तोडगा काढण्यासाठी विधेयकात दुरूस्ती केली जाऊ शकते. तसेच सर्व संमतीने ते मंजूर व्हावे यासाठी प्रस्तावित 33 टक्के आरक्षणात काही अंशी कपात केली जाऊ शकते.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "महिला आरक्षणात कपातीचे पवारांचे संकेत"
Post a Comment