डेक्कन चार्जर्सकडून धोनीच्‍या संघाचा पराभव

Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk

चेन्‍नई
डेक्कन चार्जर्सने आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 31 धावांनी पराभव करत या मालिकेतील आपला पहिला विजय नोंदवला आहे. डेक्कनने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 190 धावा कुटल्या.

सामन्‍याच्‍या लाईव्‍ह स्‍कोरसाठी येथे क्लिक करा

या धावसंख्येचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ 20 षटकांमध्ये नऊ विकेट गमावत केवळ 159 धावाच करू शकला.

चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीने 42 तर मॉर्केलनेही 42 धावा काढल्या. त्यांच्या या फटकेबाजीचा फायदा मात्र संघाला मिळू शकला नाही. 




वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "डेक्कन चार्जर्सकडून धोनीच्‍या संघाचा पराभव"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner