दादाच्‍या सरदारांचा दुसरा विजय

Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk

कोलकाता

शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा पराभव करत आयपीएल सामन्यात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. रायडर्सने या सामन्यात सात गडी राखत हा विजय मिळवला.

डेक्कन चार्जर्स विरोधातील पहिल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करणा-या एंजोलो मॅथ्युजने या सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने आपली पकड मजबूत केली.

सौरव गांगुली नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या केवळ 19 धावांमध्येच रॉयलच्या चार गड्यांनी तंबू गाठला.

20 षटकांमध्ये रॉयलने केवळ 135 धावांचेच आव्हान दिल्यानंतर नाइट रायडर्स कडून तिवारी व हॉज यांनी पहिल्या विकेटसाठी शानदार 101 धावांची भागिदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. 19.2 षटकातच तीन
विकेट गमावत नाइट रायडर्सने विजय मिळवला.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "दादाच्‍या सरदारांचा दुसरा विजय"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner