'महिला विधेयक हा आंतरराष्ट्रीय कट'

Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk


लखनऊ

भारतात कुठलीही घटना घडली की नेत्यांच्या प्रतिक्रियेत हा 'आंतरराष्ट्रीय कट' असल्‍याचे पेटंट वाक्य ठरलेलेच असते. आता महिला आरक्षण विधेयक हा 'आंतरराष्‍ट्रीय कट' आहे. असं कुणी म्हटलं तर तुम्ही काय कराल. कपाळाला हात मारून घेण्‍याशिवाय आपण दुसरं करू काय शकतो. पण हे म्हणतं कोण असा जर तुमचा प्रश्‍न असेल तर त्याचं उत्तर आहे, समाजवादी पक्षाचे अध्‍यक्ष मुलायम सिंह यादव.

मुलायम यांच्‍या मतानुसार भारतीय लोकशाही कमकुवत करण्यासाठीच महिला आरक्षण आणण्‍याचा कट 'आंतरराष्ट्रीय समुदायाने' रचला आहे.

CO.CC:Free Domain
मुलायम यांच्या समाजवादी पक्षाने पूर्वीपासूनच महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला आहे. त्यांच्या खासदारांनी राज्यसभेत तर उच्छाद मांडत उप राष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

आता त्यांचे नेते मुलायम यांनी या प्रकरणी सरकारवर आरोप करत महिला आरक्षण आणल्याने भारतीय लोकशाही कमकुवत होईल असा जावईशोध लावला आहे. महिला आरक्षण हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

भारतीय लोकशाहीच्या विरोधकांचा हा डाव सरकारला समजत नसल्याचेही मुलायम यांचे म्हणणे आहे.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'महिला विधेयक हा आंतरराष्ट्रीय कट'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner