माया'हार' प्रकरण: शर्मांची हकालपट्टी
Posted on Thursday, March 18, 2010 by maaybhumi desk
बसपच्या कार्यकर्त्यांनी मायावतींच्या माळेसाठी निधी जमवल्याचे वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकचे बसप प्रवक्ते एन के शर्मा यांना पक्षातून काढण्यात आले आहे. आपण असे कोणतेही वक्तव्य केलेच नसल्याचे यानंतर शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
लखनौमध्ये झालेल्या बसप रॅलीत मुख्यमंत्री मायावती यांना कोट्यवधीच्या हजाराच्या नोटांचा हार घालण्यात आला होता. यानंतर विरोधकांनी या प्रकरणी मायावतींच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हा हार बसपच्या कार्यकर्त्यांनी निधी जमवून तयार केल्याचे वक्तव्य शर्मांनी केले होते. यानंतर शर्मांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. बसपमध्ये सवर्णांना कोणतेही स्थान नसल्याचे सांगत पक्षातून काढण्यात आल्याने शर्मा भडकले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "माया'हार' प्रकरण: शर्मांची हकालपट्टी"
Post a Comment