भारतामुळेच बेनझीरची हत्‍याः अहवाल

Posted on Saturday, April 17, 2010 by maaybhumi desk

संयुक्त राष्ट्र/इस्लामाबाद

पाकिस्‍तानच्‍या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी भारतासोबत संबंध सुधारण्‍याची इच्‍छा दर्शविल्‍यामुळे आणि त्‍याचा काश्मीर वादावर पडत असलेल्‍या प्रभावामुळेच त्‍यांची हत्या करण्‍यात आली असल्‍याचा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्‍या समितीने दिला आहे. या समितीने आपल्‍या अहवालात हत्याकांडातील आरोपींच्‍या शोधासाठी पथक स्‍थापण्‍याचाही सल्‍ला दिला आहे.


शुक्रवारी प्रसारित करण्‍यात आलेल्‍या या 65 पानांच्‍या अहवालात तत्कालीन जनरल परवेज मुशर्रफ सरकारवर कडक शब्‍दात टीका करण्‍यात आली आहे.

भारताशी संबंध सुधारण्‍यासाठीच्‍या बेनझीर यांच्‍या स्वतंत्र धोरणामुळे त्‍यांच्‍यावर काही दहशतवादी संघटना नाराज होत्या. त्‍यातच भारताशी संबंध सुधारल्‍यास त्‍याचा काश्मीर वादावर परिणाम होईल, या भीतीतून ही हत्‍या घडवण्‍यात आल्‍याचे अहवालात म्हटले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner