आयएसआयची दहशतवादाला फूसः युएन
Posted on Saturday, April 17, 2010 by maaybhumi desk
न्यूयॉर्क
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे लश्कर-ए-तोयबासोबत घनिष्ठ संबंध असून, काश्मीरसह भारतातील इतर भागात दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर केला जात असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेने एका अहवालातून मांडली आहे.
आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करण्याच्या पाकच्या धोरणामुळे लष्कर आणि कट्टरपंथीयांमधील संबंध दृढ झाले असल्याचे या 65 पानांच्या अहवालात म्हटले आहे.