ओसामा बिन लादेनही आता फेसबुकवर
Posted on Friday, April 16, 2010 by maaybhumi desk
वॉशिंग्टन
जगभरातील फेसबुकच्या चाहत्यांमध्ये आता मोस्ट वॉंटेड दहशतवादी ओसामा बिन लादेनचाही समावेश झाला असून त्याने फेसबूकवर आपले खाते उघडले आहे. ओसामाने या सोशल नेटवर्किंग साइटचया माध्यमातून दहशतवाद्यांना गाईडलाईन देण्यास सुरूवात केली आहे.
एका अहवालानुसार ओसामाने 'द लीडर ऑफ मुजाहिद्दीन' नावाने आपले खाते उघडले असून यात त्याने आपला पत्ता माउटंन्स ऑफ द वर्ल्ड असा लिहीला आहे. सुरक्षा तज्ज्ञांनी फेसबुकच्या अमेरीकेतील कार्यालयाकडे हे पान बंद करण्याची विनंती केली आहे.
हे खाते काही महिन्यांपूर्वीच उघडण्यात आले असून एवढ्या कमी कालावधीत त्यास 1000 पेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. यात अरबी भाषेचा वापर करण्यात आला असून मॅसेज पाठविण्यासाठी कधी-कधी इंग्रजीचाही वापर केला जातो.
लेबले:
breaking news,
current news,
gossips,
hot news,
international news,
latest news,
news,
top news,
world news
