थरूर यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांचीही 'फिल्डींग'
Posted on Saturday, April 17, 2010 by maaybhumi desk
आयपीएलच्या कोची संघासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागत असलेल्या परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी जेवढे रान उठवले आहे. तितकेच त्यांच्याच पक्षातील नेत्यांनीही अंतर्गत फिल्डींग लावली असून येनकेन प्रकारे थरूर यांची या पदावरून हकालपट्टी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
काँग्रेसने सध्या विरोधी पक्षाद्वारे होत असलेल्या टीकेमुळे आपला थरूर विषयावरील पराभव लपवण्यासाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली असली तरीही थरूर यांना पदावरून काढण्यासाठी पक्षांतर्गत नेत्यांकडूनच कारवाया केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभेत शुक्रवारी या मुद्यावर थरूर बोलायला उभे राहील्यानंतर झालेल्या गोंधळा दरम्यान त्यांची बाजू घेण्यासाठी केवळ कॉंग्रेसचे राजीव शुक्ला समोर आले. तर इतर सर्व काँग्रेस नेते मात्र बघ्याची भूमिका घेत होते. आघाडीतील अनेक घटक पक्षांनीही थरूर यांना पदावरून दूर करण्यासाठी दबाव निर्माण करण्यास सुरूवात केली असून यात शरद पवार आघाडीवर आहेत.
लेबले:
breaking news,
congress,
current news,
hot news,
india,
indian news,
IPL,
latest news,
national news,
news,
top news
