नोटांची माळा कायद्याच्‍या कचाट्यात नाही!

Posted on Saturday, April 17, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

चलनी नोटांची माळा बनविणे किंवा त्‍याचा सजावटीसाठी वापर करणे यावर निर्बंध घालण्‍यासाठी कायद्यात कुठलीही तरतुद नसल्‍याची माहिती अर्थ राज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लिखित उत्तरात दिली.

मीना यांनी रिजर्व बँकेच्‍या नियमांचा आधार घेत ही माहिती दिली असून चलनी नोटांचा दुरूपयोग होऊ नये यासाठी बँकिंग कायद्यात कुठलीही तरतुद नसल्‍याचे म्हटले आहे.

असे असले तरीही रिजर्व बँकेने अशा प्रकारे नोटांचा हार बनवण्‍यासाठी, सजावटीसाठी किंवा पूजास्‍थळी व विषेश व्‍यक्तींवर उधळण्‍यासाठी वापर केला जाऊ नये असे आवाहन केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner