ठोस कारवाईशिवाय पाकशी चर्चा नाहीः भारत
Posted on Saturday, April 17, 2010 by maaybhumi desk
पाकिस्तानला भारताशी संपूर्ण चर्चा हवी असल्यास त्यांनी जमात-उद-दावा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदच्या विरोधात ठोस कारवाई करण्यासह पाकमधील दहशतवादी अड्डे उध्वस्त करावे लागतील. अन्यथा पाकशी कुठलीही चर्चा केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी जाहीर केली आहे.
भारताने याबाबत स्पष्ट केले, की केवळ मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड सईद विरोधात कारवाई करून किंवा ती करत असल्याचे दाखवून काहीही होणार नाही. पाकने आपल्या देशातून भारताविरोधात चालत असलेल्या दहशतवादी शिबिरांना आणि दहशतवाद्यांना नष्ट केल्याशिवाय चर्चेचा प्रश्नच येत नाही.
