अहमदाबाद: कच-यात आढळले 16 स्‍त्री भ्रुण

Posted on Monday, April 19, 2010 by maaybhumi desk

अहमदाबाद

अहमदाबादच्‍या बापू नगर भागात एका कचरा पेटीत भ्रुण आढळून आल्‍याने खळबळ माजली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार शहरातील लालबहादुर शास्त्री स्टेडियमजवळ एक डस्टबिनमध्‍ये 16 भ्रुण आढळून आले आहेत.


स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना सोमवारी सकाळी माहिती दिल्‍यानंतर बापूनगर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. हे सर्व भ्रुण पोस्टमार्टमसाठी पाठविण्‍यात आले असून त्‍यानंतरच ते स्‍त्री होते की पुरूष हे स्‍पष्‍ट होऊ शकणार नाही. याबाबत स्‍थानिक लोकांनी एका जवळच्‍या मॅटर्निटी रुग्णालयावर संशय व्‍यक्त केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner