इंटरनेट वापरण्‍यात भारत चवथा

Posted on Monday, April 19, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

सध्‍याच्‍या जीवन पद्धतीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून इंटरनेटचा वापर करणा-यांच्‍या संख्‍येनुसार भारत जगात चवथ्‍या क्रमांकावर असल्‍याचे एका अहवालातून म्हटले आहे. या या‍दीत चीन पहिल्‍या क्रमांकावर आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलट यांनी लोकसभेत एका लिखित प्रश्‍नाला दिलेल्‍या उत्तरात ही माहिती दिली. भारतात आठ कोटी दहा लाख लोक इंटरनेटचा वापर करीत असून चीनमध्‍ये 36 कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत असतात. पायलट यांनी दिलेल्‍या माहितीनुसार देशात सामान्‍य लोकांच्‍या दैनंदीन जीवनात इंटरनेटचा वापर वाढावा यासाठी युनिवर्सल सर्व्‍हीस ऑब्लिगेशन फंडची (यूएसओएफ) स्थापना करण्‍यात आली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner