आयशा-शोएबचा निकाहनामा सादर
Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेले शोएब व आयेशा सिद्दीकी यांच्या लग्नाचे प्रकरण आता चांगलेच तापू लागले आहे. आयेशाने शोएबशी लग्न केल्याची कागदपत्रे (निकाहनामा) सादर करून शोएब आणि कुटुंबियांची बोलती बंद करून टाकली आहे.
हा निकाहनामा आयेशाकडून पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आला होता. तो आज दिवसभर अनेक पाकिस्तानी चॅनेलवरून दाखवला जात होता. या निकाहनाम्यात वर म्हणून शोएबची तर वधू म्हणून आयेशाची स्वाक्षरी आहे.
शोएब आणि त्याचे कुटुंबिय आमचे लग्न झाले हेच नाकारत होते, म्हणून हा निकाहनामा जगजाहिर केला, असे आयेशाने दुनिया या वाहिनीशी हैदराबादवरून बोलताना सांगितले. शोएबने सानियाशी लग्न केल्यास ते त्याचे दुसरे लग्न असेल, असे या निकाहनाम्यासरशी सिद्दीकी कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आता माध्यमांनी पाठबळ दिल्याने आयेशाचे वडिल मोहम्मद सिद्दीकी आक्रमक झाले असून कायदेशीत मदत घेण्याबरोबरच आता ते उलेमांकडे धाव घेऊन शोएबविरूद्ध फतवा काढण्याच्या तयारीत आहेत.
आज प्रसिद्ध करण्यात आलेला निकाहनामा हा शोएबशी लग्न झाल्याचा पुरावा आहे, असे आयेशाने म्हटले आहे. या निकाहनाम्यावर साक्षीदारांच्या सह्या आहेत. शोएबने हा निकाहनामा आणि मेहेरचे पाचशे रूपयांची रक्कमही पाकिस्तानी रूपयांत पाठवल्याचे आयेशाचे म्हणणे आहे.
शोएब आपल्याशी लग्न केल्यानंतरही नाखुश होता, असेही आयेशाने म्हटले आहे. आपल्या वजनाबद्दलही तो वारंवार बोलायचा. म्हणूनच दिल्लीत जाऊन मी शस्त्रक्रिया करून वजन कमी करून घेतले असेही तिने सांगितले. पण इतके करूनही आता तो लग्न केल्याचेच नाकारत असल्याने मी उध्वस्त झाल्याचे ती म्हणाली.
शोएबच्या मागे कुटुंबीय ठाम
आयेशाने निकाहनाम्याच्या रूपाने बॉम्बगोळा टाकल्यानंतर पाकिस्तानात शोएबच्या कुटुंबियातही त्याचे प्रतिसाद उमटले. परंतु, ते सर्व जण शोएबची बाजू लावून धरण्यात गुंतले आहेत. शोएबचा मेव्हणा इमरान झफर मलिकने तर ही सगळी कागदपत्रे बनावट असल्याचा दावा केला. जे घडलेच नाही, त्याची कागदपत्रे तयार कशी होतील? असा सवालही त्याने केला. आयेशा ही अतिशय हुषार मुलगी आहे, परंतु, तिला चुकीचा मार्ग दाखवला जात आहे, असा आरोपही त्याने केला. सिद्दीकी कुटुंबिय याच मुद्यावर कायम राहिल्यास आम्ही भारतात त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईचा विचार करू असेही त्याने सांगितले.
'Pakistanis like Shoaib cheat Indian girls'
Hyderabad
The Sania-Shoaib wedding saga turned bitter on Friday as Ayesha’s father came out against the Pakistani cricketer in strongest of words, saying he had been cheated and that Pakistanis were engaged in fraud vis-à-vis relations with Indian girls.
At a dramatic press conference, MA Siddiqui said the ‘nikahnama’ that had been produced before the media earlier in the day was genuine, having the stamp of the Qazi who conducted the wedding, the signature of the witnesses and of Shoaib himself.
Ayesha, who claims to have married Shoaib in 2002, went the whole hog today circulating copies of her nikahnama to Pakistani and Indian channels where she poured her heart out on the break-up.
