'सानिया भाभी वेलकम टू पाकिस्‍तान'

Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk

इस्‍लामाबाद


भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक यांचे लग्न आता सोशल नेटवर्कींग साईटवरही गाजत आहे. फेसबुकवर त्यांच्या चाहत्यांनी 'सानिया भाभी वेलकम टु पाकिस्तान' या नावाने पेज तयार केले आहे.


आयशा-शोएबचा निकाहनामा


सानिया-शोएबचा निकाह 15 एप्रिल रोजी होणार आहे. त्यांचे लग्न हा आता फक्त मौखिक चर्चेसाठी चवीचा विषय राहिला नाही तर सोशल नेटवर्कींग साईटवरही गाजयला लागला आहे. सानिया-शोएबच्या पाकिस्तानातल्या चाहत्यांनी फेसबुकवर 'सानिया भाभी वेलकम टु पाकिस्तान' या नावाचे नवे पेज बनविले आहे. या पेजवर हजारो नेटिझन्सच्या उड्या पडता आहेत. अनेक त्यांच्या लग्नाबद्दल  प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. तसेच दोघंही लग्नानंतर दुबईत राहाणार असल्याबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. या पेजवर सानिया आणि शोएबशी संबंधित लिंक आणि त्यांचे फोटोही दिले आहे. आतापर्यंत 400 पेक्षा जास्त लोकांनी या पेजचे सभासदत्व घेतले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner