देशात १५ व्या जनगणनेला प्रारंभ
नवी दिल्ली
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरूणाचलापर्यंत पसरलेल्या अवाढव्य भारतभूमीवर असलेल्या मानवप्राण्यांची शिरगणती आजपासून सुरू झाली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज या मोहिमेला सुरवात केली.
या मोहिमेत शंभर कोटी लोकांची ओळख पक्की करून त्यांची नोंद करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जनगणना
रजिस्टरमध्ये नोंद करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे.
जनगणना विभागाचे अधिकारी आज राष्ट्रपती भवनात गेले. तिथे त्यांनी या रजिस्टरमध्ये पहिल्यांदा राष्ट्रपतींची नोंद केली.
यावेळी गृहमंत्री पी. चिदंबरम, महारजिस्ट्रार सी. चंद्रमौळी, जनगणना आयुक्त एस. के. चक्रवर्ती उपस्थित होते.
देशाची ही पंधरावी जनगणना आहे. त्यासाठी २५ लाखांहून अधिकारी व कर्मचार्यांना जुंपले आहे. एक एप्रिल ते एक जून या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
New Delhi
India on Thursday launched a new census of its 1 billion-plus population with a 2.5 million-strong army of census-takers fanning out across the country to conduct what has been billed the world's largest administrative exercise.
The marathon task began with President Pratibha Patil becoming the first citizen to be enumerated.
Home Minister P. Chidambaram, Home Secretary G.K. Pillai and census officials visited the Rashtrapati Bhavan in the morning and collected details from the president, a symbolic inauguration of the process to count and create a data base of each citizen.
"My name is Pratibha Devi Singh Patil and my permanent address is Jalgaon, Maharashtra," the president said, sharing her details with a census enumerator.