पदवीप्रदानची गाऊन प्रथा 'पोपधार्जिणी'- रमेश
Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk
भोपाळ
वाद निर्माण करण्यात हातखंडा असलेले पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी आता नवा वाद जन्माला घातला आहे. पदवीदान कार्यक्रमात विशिष्ट प्रकारचा गाऊन आणि टोपी घालणे ही मध्ययुगीन वसाहतवादी आणि पोपधार्जिणी प्रथा असल्याचे सांगून त्यांनी स्वतः चढविलेला गाऊन आणि टोपी विद्यार्थ्यांसमोरच उतरवली.
भोपाळमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या पदवीदान समारंभात हे नाट्य घडले. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षे उलटली तरीही आपण या वसाहतवादी प्रथांचा अवलंब का करतो आहोत हे कळत नाही, अशी मल्लिनाथी त्यांनी यावर केली.
साध्या कपड्यांत हा कार्यक्रम का केला जात नाही? मध्ययुगीन कालखंडात पोप आणि धर्मोपदेशक घालत असत अशा वेषात हा सोहळा का पार पाडला जातो, असा सवालही त्यांनी केला. रमेश यांच्या या कृतीने उपस्थितांच्या टाळ्या पडल्या नसत्या तरच नवल.
Ramesh removes convocation gown, calls it 'barbaric'
Bhopal
Stoking a potential controversy, Environment Minister Jairam Ramesh on Friday called as "barbaric colonial relics" the practice of wearing the traditional coloured robe at convocation ceremonies and publicly removed his own gown at one such event.
"I still have not been able to figure out after 60 years of Independence why we stick to this barbaric colonial relics," Ramesh said while addressing students at the seventh convocation of the Indian Institute of Forest Management (IIFM).
Ramesh also posed a question as to why there cannot be a convocation with everyone sporting a simple dress.
"Why we cannot have a convocation in simple dress instead of coming dressed up as medieval vicars and popes," he asked, as he removed his gown worn over his trademark white kurta.
Ramesh's dramatic action drew a loud applause from the assembled gathering.