प.बंगालमध्ये चक्रीवादळात 45 ठार
Posted on Wednesday, April 14, 2010 by maaybhumi desk
कोलकाता
पश्चिम बंगालच्या उत्तरी दिनाजपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री आलेल्या भीषण चक्रीवादळात सुमारे 45 जण मारले गेले असून सुमारे 100 जण बेपत्ता झाले आहेत. तर 50 हजार लोक बेघर झाले आहेत.
वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली असून त्यात अजुनही अनेक जण दाबले गेले असण्याची शक्यता आहे. बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. तर बेघरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच अशा प्रकारच्या वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे वादळ मंगळवारी रात्री 11.40 ते 12.20 दरम्यान आले.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
jyoti basu,
latest news,
national news,
news,
top news,
west bengal