कसाबला वर्षभरात फाशी
Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अजमल आमीर कसाबला वर्षा अखेरीपर्यंत फासावर लटकावले जाणार असल्याचे संकेत केंद्रीय गृह सचिव जी. के. पिल्लई यांनी दिले आहेत.
पिल्लई यांनी याबाबत सांगितले, की अद्याप कसाबच्या वकीलांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नाही. जर ती केली गेली नाही तर कसाबला लवकरच फासावर लटकवले जाऊ शकते.
