देवबंदचा स्त्रियांसाठी 'तालिबानी' फतवा
Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk
मुस्लिम महिलांना एखाद्या बकरीसारखी वागणूक देण्याचे आदेश दारूल उलूम देवबंदने आपल्या नवीन फतव्याद्वारे दिले असून महिलांनी पुरुषांसोबत कार्यालयात काम करण्यासही या फतव्याद्वारे बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम शिक्षण संस्था नदवातुल उलेमाचे प्रधानाचार्य मौलाना सैदुर रहमान आजमी नदवी यांनी शरीयत कायद्याचा हवाला देताना मुस्लिम महिलांना पुरूषांसोबत काम न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तशी आवश्यकताच असेल तर बुरखा घालून आणि पुरेसे अंतर ठेवून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे.
संसद आणि विधीमंडळातही महिलांसाठी वेगळे स्थान असावे अशी मागणी केली आहे. मुस्लिम महिला व पुरुषांना खिजाब लावण्याबाबतही निर्बंध घालण्यात आले असून शरीयतमध्ये मेंहदी लावण्याची परवानगी असली तरीही खिजाब धोकेबाजीचे प्रतिक असल्याने ते न लावण्यास सांगितले आहे.
