कृष्णा पाक दौ-यावर जाणार
Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk
भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मंगळवारी फोनवर सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चे दरम्यान पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या आमंत्रणावरून परराष्ट्र मंत्री एम.एस. कृष्णा येत्या 15 जुलैपासून पाक दौ-यावर जाणार आहेत.
पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी आमंत्रण दिल्यानंतर कृष्णा यांनी चर्चेसाठी पाकला जाण्यास संमती दिली असून द्विपक्षीय चर्चेतून दोन्ही देशांमध्ये संबंधांना नवे आयाम मिळणार आहेत. या दौ-यात दहशतवाद, मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा यासह किशनगंज येथील पाणी वाटप कराराबाबतही चर्चा होणार आहे.
