नक्षलग्रस्‍त भागात जनगणनेस कर्मचा-यांचा नकार

Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk

दंतेवाडा

छत्तीसगढच्‍या दंतेवाडा जिल्‍ह्यातील कोंटा ब्‍लॉकमधील 69 शिक्षकांनी नक्षलग्रस्‍त भागात जनगणना करण्‍यास नकार दिला आहे. या शिक्षकांनी कलेक्टरला दिलेल्‍या एका निवेदनात नक्षलग्रस्‍त भागात जनगणना करण्‍यास नकार दिला आहे.

निवेदनात हा भाग नक्षलग्रस्‍त असून येथे काम करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. दरम्‍यान, दंतेवाडा जिल्‍ह्यातील मनीकोटा गावाजवळ पोलिसांनी सोमवारी राष्ट्रीय राजमार्गावर 50 आणि 25 किलोचे दोन भू-सुरूंग जप्‍त केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner