पन्‍ना अभयारण्‍यात तीन वाघांचा जन्‍म

Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk

भोपाळ

मध्यप्रदेशातील पन्ना व्‍याघ्र प्रकल्‍पात नुकत्याच दोन वाघाच्‍या बछड्यांनी जन्‍म घेतला असून त्‍यामुळे वन्‍यजीव प्रेमींमध्‍ये आनंद व्‍यक्त होत आहे. टायगर रिजर्व व राष्ट्रीय अभयारण्‍यांतून येथे आणल्‍या गेलेल्‍या दोन वाघीणींपैकी एकीने पेंच अभयारण्‍यातील वाघाच्‍या संपर्कातून या पिलांना जन्‍म दिला आहे. गेल्‍या वर्षी येथील वाघ संपुष्‍टात आले होते.

पिले आता 20 दिवसांची झाली असून त्‍यांचे 10 दिवसांपूर्वीच डोळे उघडले आहेत. बाहेरच्‍या जंगलातून एखाद्या व्‍याघ्र प्रकल्‍पात पिले जन्‍माला घालण्‍याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी राजस्थानच्‍या सरिस्का अभयारण्‍यात रणथंभोरहून आणल्‍या गेलेल्‍या वाघिणीचा पिले जन्‍माला घालण्‍यापूर्वीच मृत्यू झाला होता.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner