Showing posts with label Maharashtra Navnirman Sena. Show all posts
Showing posts with label Maharashtra Navnirman Sena. Show all posts

संप मिटवा, अन्‍यथा परिणामांना तयार रहा- राज

मुंबई

पगारवाढीच्‍या मागणीसाठी मोटरमन्सनी आंदोलन सुरू केले असले तरीही त्यामुळे लाखो मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन मोटरमन संघटनांनी त्वरित आंदोलन बंद न केल्‍यास महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना सायंकाळपासून मोटरमन विरोधात आंदोलनात उतरेल आणि मनसेचे आंदोलन कसे असते हे तुमही चांगलेच समजून आहात असा स्‍पष्‍ट इशारा राज ठाकरे यांनी मोटरमन्सला दिला आहे.

आता बँकांमध्‍येही मराठीची राज ठाकरेंची मागणी


मुंबई

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता बॅंकांनी आपला कारभार मराठीत करावा याकडे मोर्चा वळवला आहे. बॅकांची एटीएम, कॉल सेंटर्स आणि त्यांचे ग्राहकांशी होणारे पत्रव्यवहार मराठीत व्हावेत, असे मनसेने बॅंकांना बजावले आहे.

बॅंकांची ग्राहकांना जाणारी पत्रे बहुतांश वेळा फक्त इंग्रजीतच जातात. पण इंग्रजी येत नसलेल्या मराठी ग्राहकांना ती समजून घेणे अवघड जाते. त्यामुळे पत्रव्यवहारात मराठीचाही समावेश करावा अशी मनसेची मागणी आहे. त्यासाठी बॅंकांनी मराठी तरूणांचीही भरती करावी असेही मनसेचे म्हणणे आहे.

जेव्‍हा राज ठाकरे सीएसटीला व्‍हीटी संबोधतात

मुंबई


मराठी माणूस आणि मुंबईच्‍या नावाने 'राज'कारण करणारे मनसे नेते राज ठाकरे पुनहा एकदा वादाच्‍या भोव-यात सापडले आहेत. यावेळी मराठीच्‍या अट्टहासामुळे किंवा उत्तर भारतीयांवर तथाकथित विखारी वक्तव्‍यामुळे वाद निर्माण झालेला नसून मराठीचा अट्टहास करणा-या राज यांनी सीएसटीला व्‍हीटी असे संबोधल्‍यामुळे झाला आहे. राज यांच्‍या या दुतोंडी धोरणामुळे राष्‍ट्रवादीसह कॉंग्रेसच्‍या नेत्यांनी त्यांच्‍यावर तोंडसुख घ्‍यायला सुरूवात केली आहे. तर मराठी माणूसही आश्‍चर्यचकीत झाला आहे.

महेश भट यांना हिसका दाखवतोचः राज ठाकरे

महेश भट यांना माझ्या कचाट्यात सापडू तर दे मग त्याला हिसका दाखवतो अशा शब्दात राज यांनी एका जाहीर कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक भट यांना दम भरला आहे. काही दिवसांपूर्वी एका चित्रपट निर्मात्याकडून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी 11 मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती. या कार्यकर्त्यांनी कोणतीही खंडणी मागितली नव्हती. तर हे सगळे काम महेश भट यांचे असून, त्यांनीच मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकत आपल्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचा दावा राज यांनी केला आहे.

ठाकरे विषारी बोलू नकाः न्‍यायालय

नवी दिल्‍ली

परप्रांतियांविरोधात विद्वेष पसरविणारी वक्तव्ये करू नये अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली आहे. अशी वक्तव्ये करण्याचे न थांबविल्यास त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करू असा इशाराही दिला आहे.

राज यांच्यावर पाटणा, जमशेदपूर आणि मध्य प्रदेश या ठिकाणी अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे सगळे खटले दिल्लीत एकाच ठिकाणी आणावेत अशी मागणी राज यांनी एका याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. त्यासंदर्भात कोर्टाने त्यांना आज ही तंबी दिली.

राज ठाकरे यांच्‍यावर राज्यभरात 73 खटले

मुंबई


महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍यावर राज्यभरात 73 वेगवेगळे खटले दाखल करण्‍यात आली असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेल्‍वे परीक्षे दरम्यान उत्तर भारतीयांना झालेल्‍या मारहाणीबद्दल राज ठाकरे यांना अटक करण्‍यात आली होती. त्‍या घटनेमुळे राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्‍या प्रकरणी राज यांच्‍यावर हे खटले दाखल करण्‍यात आले आहेत.


राज यांना 73 पैकी सहा खटल्‍यांमध्‍ये जामीन मिळाला असून उर्वरित खटल्‍यांबद्दल अद्याप न्‍यायालयासमोर सुनावणी झालेली नाही.

प्रवीण महाजन यांचं निधन

मुंबई

भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या प्रवीण महाजन यांचे आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाल्याचे ज्युपिटर रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

11 डिसेंबर रोजी प्रवीण यांना अचानक चक्कर आली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 तारखेला ते कोमात गेले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले.

मुंबई कष्‍टक-यांचीहीः आशा भोसले

मुंबई

'मुंबई सर्वांचीच' या विधानात आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही सूर मिसळला आहे, तोही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच.

एका टिव्ही चॅनेलच्या वतीने आशाताईंचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे हेही उपस्थित होते. ही संधी साधून आशाताईंनी मुंबई आणि मराठी माणूस या वादासंदर्भात आपले मत व्यक्त केले.

मराठी-अमराठी मुद्यात आता 'गॉगलशेठ'चीही एन्‍ट्री

Karuna-1-pib
आयुष्‍यभर हिंदीच्‍या नावाने बोटं मोडणा-या आणि हिंदी विरोधी वातावरण तापवत ठेवून त्‍यावर आपली राजकीय पोळी भजून घेणा-या तमीळनाडूचे मुख्‍यमंत्री एम. करुणानिधी यांना आता उतारवयात हिंदीबद्दल प्रेम दाटून आले असून त्यांनी आपल्‍या राज्यात हिंदीचा प्रचार करण्‍यास आपला कधीही विरोध नव्‍हता असे स्‍पष्‍ट केले आहे.

बोटचेप्या भूमिकेबद्दल 'राष्ट्रवादी'ची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबईashok chavan
मराठी लोकांसंदर्भात सातत्याने बोटचेपी भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता आपल्या सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच लक्ष्य ठरले आहेत. टॅक्सी चालकांना परमिट देण्याचा मुद्दा असो वा मुंबई कुणाची या वादात राहूल गांधीची केलेली पाठराखण या सगळ्यातून मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मराठी लोकांची भूमिका मांडलीच नाही, असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

मुंबईत पुन्‍हा 'खान'वरून 'खणाखणी'

मुंबई
शाहरूख खानने शिवसेना प्रमुखांची माफी मागणार नाही, अशी उर्मटपणाचे वक्‍तव्‍य न्‍यूयॉर्कमध्‍ये करण्‍यापूर्वी हे विसरू  नये की मन्‍नत मुंबईत आहे पाकिस्‍तानात नाही. त्‍याने हिंमत असेल तर हेच वाक्य पुन्‍हा मुंबईत बोलून दाखवावे, अशी तंबी खा.संजय राऊत यांनी दिली आहे.

जन्माने मराठी असलेल्यांनाच नोकरी मिळावी- राज

मुंबई
मराठीच्या नावाखाली बिहारींना मराठी शिकवण्यासारखी वाट्टेल ती आंदोलने करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांनी आज परखड शब्दांत कानउघडणी केली. जन्माने मराठी असलेल्याच प्राधान्य मिळावे, असे पक्षाचे धोरण असल्याचे सांगून कुणीही त्या धोरणाविरोधात काम करू नये असेही त्यांनी बजावले.

राम कदमांची 24 तास 'मनसे' सेवा

मुंबई
महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांच्‍या संपर्क कार्यालयाचे त्‍यांच्‍या मतदार संघात शुक्रवारी राज ठाकरे यांच्‍या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. 24 तास उघड्या राहणा-या या कार्यालयाला दरवाजा नसून जनतेच्‍या कुठल्‍याही समस्‍या सोडवण्‍यासाठी आपण तत्पर असल्‍याचे कदम यांनी यावेळी सांगितले.

कदम यांच्‍या या वैशिष्‍ट्यपूर्ण कार्यालयाला कुठलेही कुलूप किंवा दरवाजा बसविण्‍यात आलेला नसून जनतेच्‍या  अडचणी सोडवण्यासाठी कदम यांनी वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी सांभाळणा-या 20 कर्मचा-यांची नियुक्त केली आहे.  या कर्मचा-यांना स्‍वखर्चातून पगार देणार असल्‍याची माहिती यावेळी कदम यांनी दिली आहे. कार्यालयाच्‍या कामाची मार्गदर्शक तत्‍वे इथे ठळक अक्षरात लावण्‍यात आली असून लोकांना मोफत सेवा दिली जाणार आहे.

'झेंडा'चा शो ठाण्यात बंद पाडला

मुंबई
वादग्रस्त ठरलेल्या झेंड्यामागचे शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे अजून दिसत नाही. 'स्वाभीमान' गुंडाळून हा चित्रपट आज रिलीज झाला असताना ठाण्यात मात्र नाराज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कथित कार्यकर्त्यांनी हा चित्रपट बंद पाडला. राज ठाकरे यांची चुकीची प्रतिमा या चित्रपटात उभी केली असा या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.एकीकडे बेळगावात मात्र, या चित्रपटाचे फटाके लावून स्वागत करण्यात आले.

....तर एकही टॅक्सी चालू देणार नाहीः राज

मुंबईtaxi135
यापुढे मुंबईत नवे परवाने फक्त मराठीच टॅक्सी चालक दिले जावेत. जर राज्‍य सरकारने उत्तर भारतीयांना टॅक्सी चालकाचा परवाना देण्‍याचा प्रयत्नही केला तर मुंबईत एक‍ही टॅक्सी चालू देणार नाही. ही धमकी समजायची तर तसं समजा अशा शब्‍दात मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्र्यांना समज दिली आहे.

मुंबईत मराठी येणा-यांनाच टॅक्सी चालविण्‍याचा परवाना दिला जाईल या मंत्रिमंडळाच्‍या निर्णयानंतर उठलेल्‍या वादामुळे निर्णय मागे घेणा-या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना टॅक्सीच्या नव्या परवान्याबाबतच्या निर्णयाबाबत आज घुमजाव करीत असतानाच या सहज मिळालेल्या  फुलटॉसवर राज ठाकरे यांनी सणसणीत राजकीय षटकार खेचला असून नवे परवाने केवळ मराठी तरुणांनाच मिळाले पाहिजेत, असा दम सरकारला भरला आहे.

रद्द करण्यात आलेल्या टॅक्सी परवान्यांचे नूतनीकरण करताना मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणा-यांनाच हे परवाने दिले जातील, असा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी नवीन ४५०० टॅक्सी मुंबईत धावणार आहेत. त्याबाबतचे पत्रकही मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाने जारी केले होते. या पत्रकानुसार मराठीचे ज्ञान असलेल्यांनाच परवाने दिले जातील, असे स्पष्ट होत होते. या निर्णयाबाबत देशभरात वादळ उठले. या गदारोळानंतर आज अचानक मुख्यमंत्र्यांनी आपल्या कालच्या भूमिकेत बदल करीत  मराठी बरोबर हिंदी व गुजराती येणा-यांनाही परवाने दिले जातील असे जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला असून उत्तर प्रदेशीयांना टॅक्सी परवाने दिल्यास एकही नवी टॅक्सी मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा त्‍यांनी दिला आहे. यापूर्वी देण्यात आलेले परवाने तपासून पाहण्याची मागणीही राज यांनी केली. ही धमकी समजायची असेल तर ती तशी समजा, असे थेट आव्हानही त्‍यांनी दिले.

वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आज मनसेच्या पदाधिका-यांच्‍या बैठकीनंतर राज यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. चव्हाण स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले नसल्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना ‘मॅडम’ काय म्हणतील, याचाच विचार त्यांच्या डोक्यात असतो. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकटे कसे बदलू शकतात, असा सवाल उपस्थित करून राज म्हणाले की, निर्णय घेण्याची क्षमता नव्हती तर निर्णय घेतलाच कशाला?

अशोक चव्हाण हे बुळचट व लाचार असून त्यांच्याकडे स्वाभिमान नावाची गोष्टच नाही, सेवायोजन कार्यालयात नोंदणी झालेले राज्यातील ४० लाख लोक नोक-यांसाठी कधी बोलावणे येईल याची वाट पाहात आहेत. अशावेळी सर्वप्रथम राज्यातील मराठी बेरोजगारांना कामाची संधी मिळाली पाहिजे, त्यानंतरच अन्य लोकांचा विचार करता येईल, असे राज यांनी ठणकावून सांगितले.

मराठी माणसाने मराठीतूनच बोलावेः राज ठाकरे

मुंबई
    raj thackerey155   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा गजर बुलंद करण्याचे ठरविले आहे. २७ फेब्रुवारीला होणार्‍या मराठी दिनानिमित्त राज यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिणार असून त्यात दैनंदिन आयुष्यातही सर्वत्र मराठीतून बोलण्‍याचा आणि मराठीचाच वापर करण्‍याचे आवाहन केले जाणार आहे. हे पत्र मनसेच्या कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी पोहोचविले जाणार आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन राज्यात मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे मराठीचा गजर बुलंद करण्यासाठी राज यांना यापेक्षा चांगला मुहूर्त सापडणे शक्य नव्हते. त्यामुळे ही संधी ते साधणार आहेत.
पत्रात राज सर्व मराठी जनतेला त्यांच्या घरात, बाहेर, ऑफिसांत, रेल्वेगाड्यांत मराठीचाच वापर करावा असे आवाहन करणार आहेत. शिवाय मराठीसाठी आपल्या लोकांनीच आग्रही रहावे असे ते बजावणार आहेत.
विशेष म्हणजे हे पत्र फक्त मराठी घरांत जाणार असे नाही. तर राज्यातील अमराठी जनतेच्या घरातही ते जाणार असून मराठीच्या आग्रहाबाबतीत राज 'भेदभाव' करण्याच्या मनस्थितीत नाहीत. राज यांच्या या आवाहनावरून गदारोळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः अमराठी लोक या राजपत्राबाबत काय भूमिका घेतील हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तेजःपूंज 'ज्‍योती'

-नितीन फलटणकर



कोलकात्त्यातील एका उच्च मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात 8 जुलै 1914 साली एक मूल जन्माला आले. ज्योती बसू असे या मुलाचे नाव. कुटुंबीयांनी दिलेले ज्योतिरींद्र बसू असे नाव शाळेत गेल्यानंतर कधी ज्योती बसू झाले ते कळलेच नाही.

मुलाने भरपूर शिकावे अशी इच्छा त्यांच्या वडिलांची होती. या दृष्टिकोनातून ज्योती बसू यांच्यावर संस्कारही सुरू झाले. पण लहानपणापासून या मुलात विलक्षण वेगळेपण होते. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही, तोपर्यंत ती करायचीच नाही असा बसू यांचा होरा होता.

ढाका जिल्ह्यातील (आता बांगलादेशची राजधानी) बोर्डी गावात त्यांचे वडील निशिकांत बसू डॉक्टरकी करत. बसू यांनीही डॉक्टर बनावे असे निशिकांत यांना कधीही वाटले नाही. त्यांनी आपल्या मुलाला आपले करियर ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले होते.

बसू यांनी प्रेसीडेंसी कॉलेजमधून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर कायदे विषयाचा अभ्यास करण्यासाठी ते ब्रिटनला रवाना झाले. इथेच भूपेश गुप्ता यांच्या माध्यमातून ते प्रथम ब्रिटनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले.

1940 चा काळ असेल. बसू पुन्हा भारतात परतल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात सर्व प्रथम सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. या काळात ते पूर्णवेळ कम्युनिस्ट पक्षाचेच काम करत.

1944 मध्ये ते ट्रेड युनियनच्या चळवळीत उतरले. यानंतर अवघ्या दोन वर्षातच ते बंगाल विधिमंडळावर प्रथम निवडून आले आणि आमदार झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या नऊ पोलित ब्युरो सदस्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.

1967 आणि यानंतर 1969 मध्ये ते संयुक्त आघाडीच्या माध्यमातून पश्चिम बंगालचे उप मुख्यमंत्री बनले. 21 जून 1977 ते 6 नोव्हेंबर 2000 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. सर्वाधीकाळ मुख्यमंत्री पदावर राहणारे ते देशातील एकमेव नेते आहेत. त्यांचा हा विक्रम अद्याप कोणताही नेता मोडू शकला नाही.

1996 मध्ये तर केंद्रात नवीन आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान म्हणून त्यांचेही नाव चर्चेत होते, पोलित ब्युरोने संयुक्त आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने जनता दलाचे एच डी देवेगौडा या काळात पंतप्रधान झाले. पोलित ब्युरोची मोठी घोडचूक असल्याचे नंतर पक्षाने मान्य केले.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर तब्येत साथ देत नसल्याने बसू यांनी 2000 मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

पक्षातील त्यांची जागा त्यांनी केव्हाच भक्कम केली होती. कम्युनिस्ट पक्ष आणि बसू असे समीकरणच बनले होते. आरोग्य साथ देत नसल्याने त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची विनंती पक्षाला केली होती, परंतु ही विनंती पक्षाने अमान्य करत पुन्हा 2005 मध्ये पोलिस ब्युरोत त्यांची नियुक्ती केली. 13 सप्टेंबर 2006 रोजी पुन्हा बसू यांनी पक्षापुढे निवृत्तीचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु बसू यांनी 2008

पर्यंत काम करावे अशी विनंती त्यांना पक्षातर्फे करण्यात आली.

… तर मी पक्ष बंद करेनः राज

मुंबई
राज ठाकरे
चित्रपटांचा परिणाम होऊन सरकार जागे होणार असेल तर मीसुद्धा माझा पक्ष बंद करून चित्रपट निर्मितीत उतरेन असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या चित्रपटाच्या ध्वनिफितीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. राज ठाकरे येणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडियाने चांगलीच गर्दी केली होती. झेंडा चित्रपटाबाबत राज ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती. ध्वनिफितीचे प्रकाशन केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या या शिक्षण पद्धतीचाच दोष आहे. आपल्या शिक्षणमंत्र्यांना जो झटका येतो ते आपले शैक्षणिक धोरण असते, महेशने चित्रपटाच्या माध्यमातून सरकार आणि पालकांना जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर चित्रपट पाहून सरकार जागे होणार असेल तर मीसुद्धा माझा पक्ष बंद करून चित्रपट निर्मितीत उतरेन. कारण आम्हीसुद्धा सरकारलाच जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
‘अस्तित्व’च्या दिग्दर्शनानंतर पुन्हा एकदा महेश मांजरेकर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. याप्रसंगी चित्रपटाचे कलाकार सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकरही उपस्थित होते. संगीतकार गायक अजित परब याने चित्रपटातील एक गीत याप्रसंगी गायले. मुख्य अभिनेता भरत जाधव मात्र अन्य कामात व्यस्त असल्याने कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.
या कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी ‘बत्ती गुल पॉवर फुल’ नावाच्या मराठी चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन केले. समीर गुप्ते आणि महेंद्र वाघमारे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश देशपांडे यांनी केलेले आहे. मकरंद अनासपुरे आणि ज्योती जोशी अभिनीत या चित्रपटात वीज समस्येवर आधारीत कथानक आहे.

A new warning by Raj Thackeray's men

Mumbai, November 14, 2009,

Is Maharashtra on the verge of a new flashpoint of "Goonda Raj"?

Raj Thackeray's party has warned the State Bank of India not to recruit any "outsiders." On Sunday, the bank will conduct exams to recruit new employees. In Maharashtra, the bank has 1100 vacancies. Thackeray's Maharashtra Navnirman Sena (MNS) has demanded that only Maharashtrians or those living in the state be allowed to take the exam for the Maharashtra openings. The MNS has officially warned the bank about this in a letter written by party leader, Bala Nandgangkar.

Himanshu Roy, a Joint Commissioner of the Mumbai Police, tells NDTV that the State Bank of India has not alerted the police to the MNS threat. He says the police will discuss the issue with the bank to ensure that Sunday's exams "are conducted smoothly."

Speaking to NDTV, a representative of the bank explained that it supports regional representation, and while anybody can apply for a vacancy, preference is given to people fluent in the local language. The official added that the recruitment exam is always conducted with police security.

Thackeray's men have been flexing their muscle with renewed vigour since the MNS won 13 Assembly seats in the recent Maharashtra elections. Earlier this week, as the new Assembly was being sworn in, MNS MLAs slapped and pushed Samajwadi Party leader Abu Azmi for taking his oath in Hindi instead of Marathi. As a result, four of Thackeray's MLAs were suspended for four years. The MNS said it was willing to apologize to the House, but not to Azmi. Before the Assembly was sworn in, Thackeray had issued a statement asking all members to take the oath in Marathi instead of Hindi. Azmi pointed out that he doesn't speak Marathi fluently, and that Hindi is the national language.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner