मुलायम सिंह यादव यांना धक्काबुक्की
Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk
उत्तर प्रदेशात नेत्यांच्या पुतळ्यांवरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून राज्याच्या मुख्यमंत्री मायावती यांनी राज्यात केवळ आपले आणि पक्षाचे दिवंगत नेते कांशिराम यांचेच पुतळे असतील यासाठी सर्व प्रकारच्या तंत्राचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. देशभर ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांची जयंती साजरी केली जात असताना लखनऊ शहरात त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून समाजवादी पक्ष आणि प्रशासनात धक्काबुक्की झाली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुलायस सिंह यादव यांच्या कार्यकाळात शहरात स्थापित करण्यात आलेल्या राममनोहर लोहिया यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पक्षाचे नेते मुलायम सिंह आणि कार्यकर्ते एकत्र आले. मात्र त्यांना तसे करू देण्यास मायावती प्रशासनाने अडविले. यामुळे मुलायम सिंह देखिल जिद्दीला पेटले आणि प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्कीत त्यांनी लोहीयांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्याचे अनावरण केले.
आता या घटनेनंतर मायावती इरेला पेटल्या असून त्यांनी मुलायम सह कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. कदाचित पुतळ्यासही या जागेवरून हलविण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. मायावती प्रशासनाने मुलायम यांच्यावर आरोप केला आहे, की त्यांनी माल्यार्पणा संदर्भात प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "मुलायम सिंह यादव यांना धक्काबुक्की"
Post a Comment