पार्क स्ट्रीट भागातील आगीत दोन ठार

Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk


कोलकाता (kolkata)

दक्षिण कोलकाताच्‍या पार्क स्ट्रीट (Park street) भागातील एका व्‍यवसायिक इमारतीच्‍या तिस-या आणि चवथ्‍या मजल्‍यावर मोठी आग लागली असून यात किमान दोन जण होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेक जण इमारतीत अडकून पडले आहेत. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे सुमारे 45 बंब घटनास्‍थळी दाखल झाले असून नियंत्रणासाठी युध्‍दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दुपारी दोन वाजेपासून लागलेली ही आग सायंकाळी उशीरापर्यंत नियंत्रणात न आल्‍याने सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


येथील पार्क स्ट्रीट भागातील बहुमजली इमारत स्टीफन कोर्टमध्‍ये ही आग लागली असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्‍याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली असली तरीही मृतांचा आकडा सहा पर्यंत पोचल्‍याची माहिती अनधिकृत सुत्रांनी दिली आहे. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्‍या 45 गाड्या आणि सुमारे 300 कर्मचारी प्रयत्नरत आहेत.

पार्क स्ट्रीट हा अतिशय दाट वस्‍तीचा भाग असून येथे अनेक मोठ्या कंपनींचे कार्यालय आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनुसार ही आग या इमारतीतील म्यूजिक वर्ल्ड स्टोर्सपासून सुरू झाली आणि काही वेळातच संपूर्ण इमारतीत पसरली. आग लागण्‍याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरीही आग अटोक्यात आणण्‍यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत या इमारतीतून किमान 45 जणांना सुरक्षित बाहेर काढण्‍यात आले असून त्यात 18 जण जखमी झाले आहेत. या इमारतीत अजुनही काही लोक अडकले असण्‍याची शक्यता आहे.




वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पार्क स्ट्रीट भागातील आगीत दोन ठार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner