ललीत मोदी आयकर चौकशीच्या जाळ्यात
Posted on Friday, April 16, 2010 by maaybhumi desk
आयपीएल आयुक्त ललीत मोदी यांच्यापुढील अडचणी कमी होत नाही. आता आयकर विभाग ललीत मोदी आणि त्याच्या नातेवाईकांचे उत्पन्नाचे स्त्रोत शोधणार आहे. आयपीएलमधील इतर संघांमधील मालकांच्या गुंतवणुकीचा तपासही आयकर विभाग करणार आहे.
आयकर विभागाने आयपीएलमधील सर्व गुंतवणूकदारांचे पत्ते मागितले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे योग्य मार्गाने आले की नाही याचीही चौकशी आयकर विभाग करणार आहे.
कोची संघ आणि शशी थरुर यांनी पंजाब आणि राजस्थान संघात ललीत मोदींच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्याचा आरोप केला होतो. यामुळे ललीत मोदी आयकरच्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहे.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
IPL,
IPLcricketnews/ iplscore,
latest news,
sports,
top news,
आयपीएल
