असा येतो आयपीएलमध्ये पैसा...
Posted on Friday, April 16, 2010 by maaybhumi desk
आयपीएल हा खेळ राहिलेला नाही. तो मोठा व्यवसाय झालेला आहे. आयपीएलच्या तिसर्या सत्राचे मूल्य 19 हजार कोटी रुपये आहे. आयपीएलबाबतची रोचक माहिती...
आयपीएल तीन मूल्य: 4.13 अब्ज डॉलर म्हणजेच 19 हजार कोटी रुपये
आयपीएल दोन मूल्य: 2.01 अब्ज डॉलर होते.
ब्रॉंड फायनान्सने आयपीएलला जगातील सहावा सर्वात महागडा खेळ म्हटले आहे.
आयपीएल प्रेक्षक: टीव्ही 20 कोटी तर इंटरनेटवर 50 कोटी
आयपीएलचा विमा: सात हजार कोटी रुपये
डिएलएफचे प्रयोजकत्वः 500 कोटी रुपये
सर्वात महागडा संघ :
पुणे (1700 कोटी रुपये) चौथ्या सत्रात खेळणार
कोची (1500 कोटी रुपये) चौथ्या सत्रात खेळणार
मुंबई इंडियन्स (510 कोटी रुपये)
मालक: उद्योगपती, चित्रपट कलावंत आदी. त्यांना प्रायोजक विकण्याचा अधिकार, टीव्ही अधिकारातून बीसीसीआयला होणार्या उत्पन्नाचा वाटाही त्यांना जातो.
उत्पनाचा नवा मार्ग: इंटरनेटवर सामन्याचे सरळ प्रेक्षपणाचा अधिकार यू-ट्यूब (गूगल) ला 80 कोटी रुपयांना
विकला. यूएफओने चित्रपटगृहांमध्ये सामने दाखविण्याचे अधिकार घेतले.
कलर्स चॅनलने तीन वर्षांच्या करारासाठी 100 कोटी रुपये दिले.
अ गटाच्या खेळाडूंना 14 सामने खेळण्यासाठी सरासरी पाच कोटी रुपये मिळतात.
