कोचीच्या गुंतवणूकदारांवर आयकरचे छापे

Posted on Friday, April 16, 2010 by maaybhumi desk


नवी दिल्ली

संसदेत आयपीएलमधील ललीत मोदी आणि शशी थरुर वादावरुन गोंधळ होत असताना अहमदाबादमध्ये आयकर विभागाने  कोचीच्या गुंतवणूकदारांवर छापे मारले. कोचीमधील गुंतवणूकदार परनीचा मालक विपूल शाहसह अन्य दोघांच्या कार्यालयावर छापे मारण्यात आले आहे. परनीचे आयपीएलमधील कोची संघात 26 टक्के शेअर आहे.


शशी थरुर आणि ललीत मोदी वादावरुन राजकीय वातावरण तापले असताना आयकर विभाग गुंतवणूकदारांचे स्त्रोत शोधण्याच्या मागे लागले आहे. आयपीएलमधील गुंतवणुकीचा पैसा कोठून आला, हे शोधण्याचे काम आयकर विभागातील अधिकारी करीत आहे. विशेष म्हणजे रेंदवूचा प्रवक्ता सत्यजित गायकवाड यांनी आयपीएलमधील प्रत्येक गुंतवणूकदारांची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर हे छापे मारण्यात आले. ललीत मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner