मुरलीच्या खेळीने चेन्नईचा 'रॉयल' विजय
Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk
चेन्नईच्या विजयाच्या झंझावतापुढे राजस्थानच्या नमनने केलेली खेळी अपुर्ण ठरली. यामुळे या सामन्यात राजस्थानला 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद झालेल्या चेन्नई आणि राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांची आतिषबाजी दर्शकांना बघायला मिळाली.
आयपीएल सामन्यांचा लाईव्ह स्कोर कार्ड तुमच्या संगणकावर स्थापित करा
चेन्नईने विजयासाठी दिलेले 247 धावांच्या अशक्यप्राय आव्हानासमोर राजस्थानचा संघ टिकाव धरु शकणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु राजस्थानच्या नमन ओझा आणि शेन वॉटसन यांनी हा सामना चांगलाच रोमहर्षक केला. शेन वॉटसनने तर अवघ्या 25 चेडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 60 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर राजस्थानसमोरी विजय लक्ष कठीण होत गेले. नमन ओझा 55 चेंडूत 94 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईच्या डग बोलिंगर याने चार षटकात केवळ 15 धावा देत दोन विकेट घेतल्या.
चेन्नई सुपर किंग्जने मुरली विजय आणि ए.मार्केल यांच्या खेळीमुळे आयपीएलच्या तिसर्या सत्रातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. सलामीवीर मुरली विजय याने 56 चेंडूत आठ चौकार आणि 11 षटकार मारीत आयपीएलमधील तिसरे शतक केले. तसेच त्याने ए.मॉर्केलबरोबर 11 षटकात 152 धावांची भागेदारी केली. दुसर्या गडीसाठी आयपीएलमधील ही सर्वोच्च भागेदारी आहे. मॉर्केलने 34 चेंडूत 62 धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीपुढे राजस्थान रॉयल्सचे शेन वॉर्नसह सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. चेन्नईने निर्धारीत 20 षटकात पाच गडी गमवत 246 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली.
लेबले:
breaking news,
cricket,
current news,
hot news,
india,
indian news,
IPL,
IPLcricketnews/ iplscore,
latest news,
sports,
आयपीएल
