शोएबचे पाकमध्‍ये अनेक प्रेम प्रकरणे!

Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk

इस्‍लामाबाद

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आयेशा सिद्दीकीच्या प्रकरणात अडचणीत आला असताना त्याची प्रेयसी असल्याचा दावा करणारी आणखी एक मुलगी पुढे आली आहे. शोएबने आपल्याला फसविल्याची तक्रार अंबर नावाच्या मुलीने केली असल्याचे वृत्त पाकिस्तानी ‍वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे.


एका फोटोमध्ये शोएबबरोबर दिसणारी अंबर हिने म्हटले आहे, की शोएब चार वर्षांपासून आपणास लग्नाचे आश्वासन देत आहे. परंतु त्याने आपल्याशी लग्न केले नाही.


अंबरने शोएबबरोबर असलेला फोटोही पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांना दिला आहे. तिने लग्न केले असले तरी शोएबची लफडी जगासमोर येण्यासाठी आपणही पुढे आलो असल्याचे तिने म्हटले आहे. आयेशा सिद्दीकी खरे बोलत असेल, हे मी माझ्या अनुभवावरुन सांगते, असेही अंबरने म्हटले आहे.

अंबरच्या आरोपानंतर शोएब आणखी अडचणीत आला आहे. कारण पाकिस्तानमधीलच विवाहीत मुलगी तिच्यावर आरोप करीत आहे. 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner